

Medical Student Vaishnavi Kumbhar Inspires by Preserving Family Clay Art Tradition Alongside MBBS Studies in Pune
sakal
-प्रशांत घाडगे
सातारा : एका हातात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके, तर दुसऱ्या हातात परंपरेचे रंग... अशा आधुनिक शिक्षणाची वाट चोखाळताना कौटुंबिक वारशाची नाळ जपणारी साताऱ्यातील वैष्णवी पोपट कुंभार अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून पुण्यात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाही चौथ्या पिढीच्या पारंपरिक व्यवसायाशी तिचे नाते तुटलेले नाही. बेंदूर सणानिमित्त बैल रंगविण्याच्या कामात ती उत्साहाने सहभागी होत कुटुंबाला हातभार लावत आहे.