प्राणीप्रेमींनाे तुम्हीही हे नक्की करा; पाचगणीत रोटरी क्‍लबचा स्तुत्य उपक्रम

प्राणीप्रेमींनाे तुम्हीही हे नक्की करा; पाचगणीत रोटरी क्‍लबचा स्तुत्य उपक्रम

पाचगणी : प्राण्यांकडून मानवाकडे प्रसारित होणाऱ्या आजारांना पशुसंक्रमित आजार किंवा झूनोटिक डिसीजेस असे म्हणतात. रेबीज हा त्यातील एक महत्त्वाचा आजार आहे. त्याच्यावर कुठलाही उपचार नाही. लसीकरणद्वारे प्रतिबंध हाच काय तो एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक प्राणीप्रेमींनी आपापल्या कुत्रे व मांजरांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. सुनील देशपांडे यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर तीन दिवस राहणार बंद 

पाचगणी रोटरी क्‍लब व पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुसंक्रमित दिनाचे औचित्य साधून कुत्री व मांजरे यांच्याकरिता आयोजित केलेल्या अँटीरेबीज शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. देशपांडे बोलत होते. प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन केले. अध्यक्षस्थानी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष किरण पवार होते. शिबिरात एकूण 49 श्वानांचे लसीकरण करण्यात आले.

काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले 

भारत पुरोहित यांनी स्वागत केले. प्रकल्प प्रमुख अली सेववाला यांनी प्रास्ताविक केले. सचिव शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल आमते, अमोल चौधरी, रमेश भिलारे, रोटरी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राणीप्रेमी सामाजिक अंतर पाळून आणि मास्क लावून उपस्थित होते. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com