

Shiv Bhojan Centres Face Stricter Monitoring as Maharashtra Enforces New CCTV Rules and Action Against Centre Operators
sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: रोजच्या कमाईतून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मजुरांसह गरजू अन् रुग्णांच्या नातेवाइकांसाठी अवघ्या दहा रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी आधार आहे. थाळीचा दर्जा टिकवतानाच योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक नियम केले आहेत. जिल्ह्यातील १७ शिवभोजन केंद्रांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही, भोजनाची गुणवत्ता, ठराविक वेळेत थाळीवाटप आणि अनुदानाच्या देयकांवर काटेकोर नियंत्रण राहणार आहे.