ChatGPT on Play Store : चॅटजीपीटी अँड्रॉईडवर आलं; पण खरं अ‍ॅप कोणतं? असं करा डाऊनलोड

प्ले-स्टोअरवर जर तुम्ही 'चॅटजीपीटी' सर्च केलं, तर कित्येक एआय अ‍ॅप्स तुम्हाला दिसतील..
ChatGPT on Google Play Store
ChatGPT on Google Play StoreeSakal
Updated on

चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट अखेर अँड्रॉईडवर उपलब्ध झाला आहे. गुगल प्ले स्टोअरमधून तुम्ही चॅटजीपीटीचं अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. यापूर्वी चॅटजीपीटी हे केवळ पीसी आणि अ‍ॅपलवर उपलब्ध होतं.

काय आहे चॅटजीपीटी?

ओपन एआय कंपनीने तयार केलेला हा एक एआय चॅटबॉट आहे. हा चॅटबॉट यूजर्सना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देतो. कित्येक विद्यार्थी आपला होमवर्क करण्यासाठी, तर कित्येक लोक आपलं ऑफिसचं काम करण्यासाठी याचा वापर करतात. अर्थात, चॅटजीपीटीवर उपलब्ध असलेली माहिती ही केवळ सप्टेंबर २०२१ पर्यंतची आहे. (ChatGPT App)

ChatGPT on Google Play Store
AI for India 2.0 : आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण; मोदी सरकारने लाँच केली मोठी मोहीम

यापूर्वी हा चॅटबॉट केवळ कम्प्युटर किंवा आयफोनवर वापरता येत होता. आता अँड्रॉईड मोबाईलसाठी देखील याचं अ‍ॅप उपलब्ध झालं आहे. मात्र, गुगलच्या प्ले-स्टोअरवर जर तुम्ही 'चॅटजीपीटी' सर्च केलं, तर कित्येक एआय अ‍ॅप्स तुम्हाला दिसतील. यातील केवळ एकच अ‍ॅप हे अधिकृत आहे. (ChatGPT on Android)

असं ओळखा अधिकृत अ‍ॅप

अधिकृत चॅटजीपीटी अ‍ॅपचा लोगो हा पांढऱ्या रंगाचा आहे. यावर काळ्या रंगाचा चॅटजीपीटीचा लोगो दिला आहे. या अ‍ॅपवर क्लिक करुन तुम्ही याची डेव्हलपर कंपनी कोणती आहे हे पाहू शकता. ओरिजिनल चॅटजीपीटी अ‍ॅप हे 'ओपन एआय' या कंपनीने तयार केलं आहे. याठिकाणी असलेल्या इन्स्टॉल या बटणावर क्लिक करून तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. (How to download ChatGPT)

ChatGPT on Playstore
ChatGPT on Playstore

ओपन एआय या डेव्हलपरने बनवलेलं अ‍ॅपच अधिकृत चॅटजीपीटी आहे. याव्यतिरिक्त इतर डेव्हलपर्सने तयार केलेले अ‍ॅप कदाचित तुमच्या फोनमधील डेटा देखील चोरू शकतात. त्यामुळे, अशा अ‍ॅप्सपासून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

ChatGPT on Google Play Store
AI Safeguards : 'एआय'चा धोका कमी करण्यासाठी प्रमुख टेक कंपन्यांचा पुढाकार; व्हाईट हाऊससोबत केला करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.