Sunita Williams Update : नभातून थेट धरतीवर! सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर रोमांचक पुनरागमन; सुखरूप परतली 'भारत की बेटी', पाहा VIDEO

Sunita Williams Return To Earth Latest Update : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. 19 मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले.
Sunita Williams Return To Earth Latest Update
Sunita Williams Return To Earth Latest Updateesakal
Updated on

Sunita Williams Return : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. 19 मार्चला पहाटे त्यांचे यान चार वाजताच्या सुमारास पृथ्वीवर पोहोचले. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या; त्यावर मात करत ते सुखरूप परत आले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) गेले केले. ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले. हा प्रवास 8 दिवसापासून 9 महिन्यापर्यंत पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन, प्रयोग केले.

Sunita Williams Return To Earth Latest Update
Sunita Williams Salary : सुनीता विल्यम्सची लागली लॉटरी! 9 महिने अंतराळात राहिल्याबद्दल मिळणार इतके कोटी रुपये, आकडा पाहून व्हाल शॉक

पृथ्वीवर परतीची योजना

या अडचणींमुळे नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. स्पेसएक्सच्या क्रू-9 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने 9 ऑगस्ट 2024 रोजी ISS वर यशस्वीपणे डॉक केले ज्याद्वारे त्यांच्या परतीची योजना निश्चित करण्यात आली.

सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या मूळ गाव गुजरातमधील झुलासन येथे ग्रामस्थ आणि नातेवाईक प्रार्थना करत होते. त्यांच्या परतीची बातमी ऐकून गावात आनंदाचे वातावरण आहे.

Sunita Williams Return To Earth Latest Update
ISS : 5 बेडरूमची साईज, 4.5 लाख किलो वजन, कसं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? जिथं 9 महिने अडकल्या सुनीता विल्यम्स, पाहा व्हिडिओ अन् फोटो

तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून राहिल्यानंतर सुखरूप परतलेल्या अंतराळवीरांच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीने त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त केला जात आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कने प्रयत्न करून स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सुल अवकाश स्थानकावर पाठवले आणि त्यांना सुखरूप परत आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com