

Video of amazing traffic discipline in Mizoram's Aizawl city goes viral.
Sakal
देशातील मोठ्या शहरांमध्ये सिग्नलवर काही सेकंद थांबावे लागले तरी हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, लेन तोडून पुढे जाण्याची घाई आणि वाहनचालकांची चिडचिड हे नित्याचेच चित्र असते. मात्र, भारतातच एक असे शहर आहे, जिथे दोन ते तीन तास ट्रॅफिक जाम लागला तरी एकही वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवत नाही.