BANGLADESH BEGGAR WITH 21 WIVES
esakal
MAN CLAIMS TO HAVE 21 WIVES: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी डान्स व्हिडिओ, तर कधी आयुष्यातील साध्या वाटणाऱ्या गोष्टी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. अशातच सध्या बांगलादेशातील एका भिकाऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या भिकाऱ्याने तब्बल २१ पत्नी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला आपल्या २१ पत्नींपैकी काहींची नावंदेखील आठवत नाहीत. या भिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याच्या दाव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.