

Cost up to Rs 1.14 lakh to build setup to play 'GTA 6
Sakal
जगभरातील गेमिंग प्रेमींना ज्या गेमची प्रचंड क्रेझ आहे, त्या 'जीटीए ६' (GTA 6) ने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेक गेमर्स या गेमच्या स्ट्रीमिंगमधून लाखोंची कमाई करत आहेत; मात्र जर तुम्हाला घरबसल्या हा गेम खेळायचा असेल आणि तुमच्याकडे कोणताही गेमिंग सेटअप नसेल, तर नेमका किती खर्च येईल? याचा सविस्तर हिशोब एका तरुणाने मजेशीर अंदाजात मांडला असून, त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.