Viral Video
Viral VideoSakal

Viral Video : सिंह अन् हत्ती जंगलातील पाणवठ्यावर आले समोरासमोर अन्...

जंगली प्राण्यांच्या एकमेकांवरील हल्ल्याचे व्हिडिओ आपण पाहिलेत का?
Published on

आपल्याला जंगलात फिरायला गेल्यावर अनेकदा प्राण्यांचे दर्शन होत असते. तर सिंह आणि वाघ हे जंगलातील प्रमुख प्राणी आहेत. त्यांच्यावर सहसा कोणते प्राणी हल्ला करत नसतात. तर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एक सिंह आणि हत्ती समोरासमोर आलेले दिसत आहेत.

Viral Video
परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती जंगलातील पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आला आहे. तर त्या ठिकाणी एक सिंह झोपलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. हत्ती पाणी पितो आणि त्याची नजर सिंहाकडे गेल्यानंतर तो सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण सिंह पळून जातो. तर हत्ती त्याचा पाठलाग करताना या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com