

UPSC Success Story: Anudeep Durishetty Quit Google Job, Cracked UPSC Without Coaching and Secured AIR 1
eSakal
Google Job to IAS: आजच्या काळात प्रत्येकाला चांगली नोकरी, मोठा पगार आणि सुरक्षित करिअर हवं असतं. त्यातही Google सारख्या जगातील मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र, काही जणांसाठी स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं हे मोठ्या पगाराच्या नोकरीपेक्षाही महत्त्वाचं असतं. अशीच काही गोष्ट आहे IAS अधिकारी अनुदीप दुरीशेट्टी यांची. त्यांनी Google मधील सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, कोणतीही कोचिंग न लावता त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला.