

Little boy lavani dance
sakal
Lavni Dance Viral Video: ‘अप्सरा आली’ गाणं सुरू झालं की अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. पण एका चिमुकल्याने या गाण्यावर असा काही ठेका धरला आहे की, त्याचा डान्स पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. चेहऱ्यावरील सुंदर हावभाव, तालावर थिरकणारे पाय आणि जबरदस्त आत्मविश्वास पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.