

Tunnel Firecracker Bursting Viral Video
sakal
दिवाळीमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आलं. ठिकठिकाणी यामुळे आग लागण्याच्या १००-२०० हून अधिक घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या तसेच व्हिडिओ देखील समोर आले आहेत. असं असतानाच सोशल मीडियावर सध्या एका बोगद्यात फटाके फोडतानाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. गाड्यांची वर्दळ सुरू असतानाच काही जणांनी चक्क बोगद्यात गाडी थांबवून फटाके फोडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गावरील असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या व्हिडीओमागचं सत्य वेगळंच असण्याची शक्यता आहे.