

WhatsApp, Telegram, Snapchat New Rule 2027: Will These Apps Stop Working Without an Active SIM Card?
eSakal
New SIM Card Rules for Messaging Apps From 2027: देशभरातील WhatsApp आणि Telegram वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारी 2027 पासून भारतात WhatsApp, Telegram यांसारख्या मेसेजिंग ॲप्सच्या वापरासंबंधी नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यासंदर्भात 28 नोव्हेंबर 2025 रोजी अधिसूचना जारी केली होती.
त्यातच आता दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या नव्या माहितीनुसार, नोंदणीकृत मोबाइल नंबरशी संबंधित SIM कार्ड सक्रिय नसल्यास या ॲप्सच्या वापर करता येणार नाही. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित ॲप्सना 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा