

Dhule Bribe Crime News : शहरातील देवपूर पोलिस ठाण्याचा हवालदार एजाज काझी याला चार हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई देवपूर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १५) रात्री झाली. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हवालदाराला अटक करण्यात आली आहे. (bribe taking constable arrested by ACB)