

Dhule News : नेर जिल्हा परिषद गटासाठी २२ लाखांचा निधी मंजूर करून विविध विकासकामांना गती मिळणार आहे. यामध्ये नेर आणि गटातील नूरनगर धरण मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणारी पाइप मोरी बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
नांद्रे रस्त्यावरील पाइप मोरी बांधकामासाठी पाच लाख रुपये निधी, नेर गावातील मनुदेवीनगर गल्लीतील काँक्रिट गटार करण्यासाठी चार लाख रुपये. (Dhule Fund of 22 lakhs approved for Ner Zilla Parishad group)
न्यू इंग्लिश स्कूल व आर्टस, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, नेर (ता.जि. धुळे) विद्यालयात गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणकामी तीन लाख रुपये निधी मंजूर करून कामाचे गुरुवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषदेंतर्गत एकूण २२ लाख निधी मिळवून नेर गटातील अनेक विकासकामांना प्रगती मिळणार असल्याने विकासकामांना चालना देण्याचे विशेष प्रयत्न करून पाठपुरावा करण्याचे काम येथील जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील यांनी केले आहे. महत्त्वपूर्ण कामातून गटातील ग्रामस्थ, नागरिकांच्या अडचणी दूर होतात.
विकासकामातून नागरिकांच्या सुखसुविधा झाल्यास हृदयस्पर्शी आनंद मिळून प्रयत्नशील कार्याला चालना मिळत असते. गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण रस्ता व्हावा. शालेय विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय महामार्गावरून जिकिरीचा प्रवास न होता गावातून शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यास विद्यार्थ्यांचा सुखकर प्रवास होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील यांनी केले. (latest marathi news)
नेर व गटासाठी मोठा निधी मिळाल्याने गावातील व गटातील ग्रामस्थांनी पाटील यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नेरच्या सरपंच गायत्री जयस्वाल, ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई मालचे, गणू जयस्वाल, निंबा खलाणे, योगेश गवळे, नारायण बोढरे, विजय देशमुख, शेख रुबाब, विजय आप्पा देशमुख, पांडुरंग खलाणे, विठ्ठल गवळे, पारस शेठ.
बापू माळी, गोविंदा भागवत, मुरलीधर बोढरे, देवबा सूर्यवंशी, नाना खलाणे, विठोबा बोढरे, शोकतमियाँ जहागीरदार, मुस्ताक पिंजारी, नारायण सैंदाणे, सुशील माळी, दगडू माळी, योगेश माळी, सदाशिव खलाणे, एजाज तांबोळी, भटू माळी.
संजय सोनवणे, आबा सोनवणे, सतीश बोढरे, बशीरदादा, रईसदादा, नाना मिस्तरी, विशाल देशमुख, बंडा भोई, विश्वास याळीस, अविनाश चौधरी, संजय कुंभार, गणेश माळी, ललित माळी, रवींद्र कुंभार, मनोहर कुंभार, अमोल याळीस आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.