वीजमीटर उपलब्ध होत नसल्यास संपर्क साधा : महावितरण कंपनी

Mahavitaran News
Mahavitaran Newsesakal

धुळे : वीजमीटरचा (Electricity Meter) तुटवडा असल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. यावर वीजग्राहकांनी विश्वास ठेवू नये. नवीन वीजजोडणी अथवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणच्या (MSEDCL) संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती महावितरणने दिली आहे. (electricity meter is not available contact MSEDCL Dhule News)

सप्टेंबर- २०२२ पर्यंत १५ लाख नवीन सिंगल फेज वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. गेल्या एप्रिलअखेर एक लाख ३१ हजार ८०२ वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते तर मेपासून आत्तापर्यंत आणखी दोन लाख ५० हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच कार्यादेश दिलेल्या ७५ हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठादेखील सुरू झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. निविदेअंतर्गत पुरवठादारांना तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश गेल्या एप्रिलमध्ये देण्यात आला आहे. त्यातून एप्रिलपासून आतापर्यंत दोन लाख ६० हजारांवर मीटर उपलब्ध झाले आहेत.

Mahavitaran News
Dhule : दरोडा टाकण्यापूर्वीच टोळी जेरबंद

३३ लाख नवीन मीटर

याशिवाय येत्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी तीन लाख २५ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. सोबतच कार्यादेशाप्रमाणे ७५ हजार नवीन थ्रीफेजच्या मीटरचा पुरवठा सुरू झाला आहे. महावितरणकडून सिंगल फेजच्या १२ लाख ८० हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मीटरची वाढती मागणी पाहता आणखी २० लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तब्बल ३२ लाख ८० हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.

Mahavitaran News
बंडखोरांवरील कारवाईच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी दिंडोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com