Nandurbar Lok Sabha Constituency : छाननीअंती 16 उमेदवारी अर्ज वैध!

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २६) छाननीअंती १६ उमेदवारी अर्ज वैध, तर तीन बाद ठरविण्यात आले. आता २९ एप्रिलला माघारीची अंतिम मुदत आहे.
Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Electionesakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २६) छाननीअंती १६ उमेदवारी अर्ज वैध, तर तीन बाद ठरविण्यात आले. आता २९ एप्रिलला माघारीची अंतिम मुदत आहे. यांपैकी कोण माघार घेते व कोण निवडणूक रिंगणात राहते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू होती आणि २५ एप्रिल ही अंतिम मुदत अर्ज स्वीकृतीची होती. (16 candidature application valid after scrutiny)

गुरुवारी (ता. २५)अंतिम दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी अकराला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. तीन अर्ज अवैध, तर १६ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.

भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित, काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी, आमदार ॲड. के. सी. पाडवी, प्रतिभा शिंदे व दोन्ही पक्षांतर्फे वकील तैनात करण्यात आले होते. या वेळी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरलेल्या सुप्रिया गावित आणि काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या हेमलता पाडवी या दोन्ही उमेदवारांचे अर्ज पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आल्याने अवैध ठरविण्यात आले.

अपक्ष उमेदवार मोठाजी तुकाराम ठाकरे यांनी जोडलेले शपथपत्र नोटरीकृत नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. एकूण १९ उमेदवारी अर्जांपैकी तीन बाद झाल्याने १६ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. आता यांपैकी कोण माघार घेतो व कोण निवडणूक रिंगणात राहणार हे २९ एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट होईल. (Latest Marathi News)

Nandurbar Lok Sabha Election
Dhule Drought News : यंदा 1972 च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी; चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर डॉ. हीना गावित यांची जोरदार हरकत

नंदुरबार ः काँग्रेस पक्षाकडून दाखल असलेल्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर भारतीय जनता पक्षाच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी हरकत नोंदविली असून, त्यावर दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सर्व अधिकारी, अर्ज दाखल करणारे सर्व उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे घोषित उमेदवार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी या तिन्ही जणांच्या उमेदवारी अर्जावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी जोरदार हरकत घेतली. तिन्ही अर्जदार एकाच परिवारातील असून, प्रत्येकाच्या अर्जात या परिवारातील सदस्य नेमके कोणावर अवलंबून आहेत याविषयीचे खोटे उल्लेख आढळत असल्यामुळे हे अर्ज नामंजूर करावेत.

असे म्हणणे डॉ. गावित यांनी मांडले होते. तथापि, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हरकत नाकारली. त्यावर दिलेला निर्णय मान्य नसल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल उमेदवारी अर्जांच्या विरोधात न्यायालयातून दाद मागणार आहेत, असे भाजप उमेदवार डॉ. गावित यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीतर्फे शक्तिप्रदर्शन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
Chhatrapati Sambhajinagar
APMC Scrutiny Sweep: 33 Applications Rejected Leaving 267 Candidates in Shirur Fray
Rajya Sabha Elections 2026
Marathi News Esakal
www.esakal.com