Dhule Drought News : यंदा 1972 च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी; चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Dhule News : साक्री तालुक्यात पाण्याअभावी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. जेमतेम हाती आलेल्या रब्बीने मोठी निराशा केली असून, कांदा भाववाढीअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
Drought
Drought esakal

म्हसदी : साक्री तालुक्यात पाण्याअभावी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. जेमतेम हाती आलेल्या रब्बीने मोठी निराशा केली असून, कांदा भाववाढीअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. वाढता खर्च करूनही, अपेक्षित उत्पन्न येऊनही कांदा शेतकरी सावरणार नसल्याचे चित्र आहे. (Drought problem of drinking water with fodder is serious)

१९७२ च्या दुष्काळाच्या आठवणी ताज्या करत असल्याच्या भावना जाणकार व्यक्त करीत आहेत. अलीकडे दुष्काळसदृश परिस्थितीची सवयच बळीराजाला झाली आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसायात वाढता खर्च करत शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा विहिरींनी ऐन पावसाळ्यातही तळ गाठला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे यंदा नियोजन बारगळणार आहे.

पाणीच नसल्याने कोणतेही हमीचे पीक येणार नाही. काही ठिकाणी केवळ पाळीव जनावरांना पाणी पाजता येईल इतका वेळ वीज पंप सुरू करणे शक्य आहे. दिवस उजाडल्यावर चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. बहुतेक शेतकरी इतरत्र शिवारात जाऊन जनावरांना पाणी पाजत असल्याचे चित्र आहे.

शिवारात होणार पांढरे सोने दुर्मिळ

यंदा विहिरींना पाणीच नसल्याने अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांची आर्थिक मदार असलेले पांढरे सोने (कापूस) व तूर शेतशिवारात फारसे दिसणार नाही. विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने यंदा कापूस, तुरीच्या लागवडीसाठी शेतकरी काळजीत आहेत. पाण्याच्या शोधासाठी विहिरीला बोअर लावणे आदी कामे केली जात आहेत; परंतु जलस्तर घटल्याने ‘आडात नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार’ अशी अवस्था आहे. गेल्या वर्षी शेतीसाठी बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. (Latest Marathi News)

Drought
Dhule News : सैन्यदल अधिकारी भरतीसाठी प्रशिक्षण; 17 मेस धुळ्यात निवडचाचणी

कोरडवाहू क्षेत्रात अधिकच भर

साक्री तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. यंदा दुष्काळामुळे त्यात अधिक भर पडली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक मदार शेती व्यवसायावर अवलंबून आहे. तथापि, रोजगारासाठी दुसरा अन्य कोणताही प्रकल्प नाही. म्हणून रोजगाराचा अभाव आहे. आदिवासी मजुरांनी यापूर्वीच स्थलांतर केले आहे. दुसऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामांची भ्रांत आहे.

हातमजुरी करणाऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मजुरांना पुरेसे काम नसल्याने घरी बसून राहण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील एकमेव पांझराकान सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. तो पुन्हा सुरू करणे अशक्य आहे. बागायती क्षेत्र यंदा कोरडवाहू दिसत आहे.

अन्य व्यवसायांनाही घरघर

पाण्याअभावी बागायती असणारी शेती अडचणीत आली आहे. याचाच परिणाम म्हणून शेती व्यवसायाशी निगडित व्यवसायही अडचणीत आले आहेत. एरवी वर्षभर मजुरांची उणीव भासत होती. आज मजुरांना काम शोधण्याची वेळ आली आहे. शेतीसाठी लागणारे लोखंडी साहित्य, लोखंड, कासरा व पांचाळ कारागीर ग्रामीण भागात दाखल झाले आहेत.

Drought
Dhule Lok Sabha Election : उमेदवारी अर्जांची आजपासून स्वीकृती : अभिनव गोयल

यंदा खासगीसह राष्ट्रीयीकृत बँकांनी तुटपुंजे खर्च हाती ठेवले आहेत. आधीच कर्जबाजारी त्यावर निसर्गाची अवकृपा यामुळे बेजार झालेला शेतकरी हतबल झाला आहे. दुष्काळाची परिसीमा सांगताना ‘बहात्तरचा दुष्काळ’ची आठवण ताजी होत असल्याची माहिती ज्येष्ठ देतात. हा शब्दप्रयोग गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रात वापरला जातो. यंदाचे साल मात्र ‘बहात्तर’पेक्षाही भयानक असल्याचे बोलले जात आहे.

"चोवीस तास अखंड चालणाऱ्या विहिरींनी यंदा तळ गाठला आहे. पाणीच नसल्याने कपाशी, तूरलागवड कशी करावी, हा प्रश्न आहे. पाऊस झाल्यावर लागवड झालेली कपाशी अपेक्षित उत्पादन देऊच शकत नाही."- यशवंतराव देवरे, ज्येष्ठ शेतकरी, म्हसदी

"यंदा दुष्काळाची तुलना १९७२ च्या दुष्काळाशी होऊ शकते. पाण्याअभावी शेतीचे नियोजन पुरते कोलमडणार आहे. पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांना उभारी येईल."- रघुनाथ देवरे, शेतकरी, म्हसदी

Drought
Dhule Bribe News : 50 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक बोरसे ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com