नाशिक- अत्यंत गुंतागुंतीच्या स्थितीत असलेल्या चार वर्षीय बालिकेला नारायणी हॉस्पिटलमध्ये दिलासा मिळाला आहे. बालिकेच्या फुफ्फुसात धारदार पिन ब्रोन्कोस्कोपीद्वारे फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. स्वप्नील साखला व त्यांच्या टीमने काढली. त्यामुळे मुलीच्या जिवाला निर्माण झालेला धोका टळला आहे.