Highly Educated Youth Duped of rupees 19 Lakh in Fake Job Scam
sakal
नाशिक - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवकाला तब्बल १९ लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेत उपसहायकपदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.