बंधाऱ्यावर प्लेटाच बसविल्या नसल्याने पाणी कसे अडणार?

बंधाऱ्यावर प्लेटाच बसविल्या नसल्याने पाणी कसे अडणार?
Published on: 
फोटो : NSK26H31378 लोय : शिवारात बांधलेल्या बंधाऱ्याला प्लेटा बसविल्या नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात असते. --------------- बंधाऱ्यावर प्लेटाच नसल्याने पाणी कसे अडणार? लोय येथील शेतकऱ्यांचा प्रश्‍न; पाणीटंचाईची भिती सकाळ वृत्तसेवा पिंपळोद, ता. ५ : नंदुरबार तालुक्यातील लोय गावाच्या शिवारात पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, त्या बंधाऱ्यात प्लेटाच बसविल्या नसल्याने दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जात आहे. यामुळे मोठा खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाच फायदा झालेला नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बंधाऱ्याला प्लेटा बसवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. लोय येथे पावसाचे पाणी अडवण्याकरिता मागील वर्षी मे- जून महिन्यात बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा बांधताना ठेकेदाराने बंधाऱ्याच्या प्लेटा बसविणे गरजेचे होते. परंतु, केवळ बंधारा बांधला, प्लेटा बसविल्या नाहीत. यावर्षी जून- जुलैत झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात येऊनही प्लेटांअभावी वाहून गेले. या बंधाऱ्याचा कुठलाच फायदा शेतकऱ्यांना आजपर्यंत झाला नाही. म्हणून हा बंधारा केवळ नावाला आहे. यासंदर्भात संबंधितांकडे वारंवार मागणी करूनही बंधाऱ्याला प्लेटा बसविण्यात येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोय शिवारातील पाणी अडवण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याला प्लेटा बसविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com