(ही बातमी ॲंकरला नाना पाटेकराच्या बाजूला क्लब करावी)
लोगो : नाना पाटेकर स्मृती (लोगो दोन्ही बातम्याच्या सेंटरला घ्यावा)
-----
NSK26H31732
नाना पाटेकर यांच्यासमवेत संवादाच्या क्षणी अशोक जैन. सोबत कविवर्य स्व. ना. धों. महानोर.
-----
शेती-मातीशी नाते जोडणारा
जिव्हाळ्याचा माणूस...
उपशीर्षक
अशोक जैन यांनी जागविल्या नानांच्या स्मृती
जळगाव : नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली अतिव दुःख झाले. नानांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकारच नव्हे, तर माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा भावना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला.
नानांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्सला आयोजित कार्यक्रमात नाना आणि मोठ्याभाऊंची (भवरलालजी जैन) भेट झाली होती. शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये जिव्हाळ्याने सविस्तर संवाद झाला. तो केवळ औपचारिक संवाद नव्हता, तर मातीवर प्रेम करणाऱ्या दोन संवेदनशील व्यक्तींचा तो संवाद होता. मोठेभाऊ, जैन परिवार आणि नाना पाटेकर यांच्यातील हा स्नेहाचा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीने जोडलेला होता. नाना गेले, पण त्यांनी जपलेली ही नाळ आणि त्यांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत असतील हे तितकेच खरे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
------