NSK26H31799
जळगाव : शिव कॉलनीतील श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित पदाधिकारी, कलाकार व परिसरातील नागरिक.
गुरुदत्त मंडळातर्फे नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
संवाद अन् गीतांतून आठवणींना उजाळा; शांती मंत्राचे पठण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : शिव कॉलनी येथील श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शांती मंत्राचे पठण करून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या संवादांचे सादरीकरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी गायक उदय कापडणे, मिलिंद सोनवणे आणि प्रा. काकडे यांनी नाना पाटेकर यांचे गाजलेले संवाद आणि गीते सादर केली. त्यांच्या अभिनयातील अजरामर प्रसंगांचे स्मरण करत उपस्थितांनी भावूक वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली. बालगोपाल, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी मनोज भांडारकर, गणेश सोनार, अमर सोनवणे, नाना चौधरी, मिलिंद सोनवणे, पिल्लू सोनार, हर्षल महाजन, ईशांत जैयस्वाल, सुभाष भांडारकर, सुधाकर सोनवणे, प्रशांत गुरव यांच्यासह परिसरातील महिला मंडळाच्या सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.