मलनिस्सारण प्रकल्पचा प्रश्न त्वरित सोडवा

मलनिस्सारण प्रकल्पचा प्रश्न त्वरित सोडवा
Published on: 
फोटो : 31751 नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीला भेट देताना पालकमंत्री गिरीश महाजन, ‘आयमा’ अध्यक्ष राजेंद्र पानसरे, महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री. --- मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रश्न त्वरित सोडवा पालकमंत्री गिरीश महाजन : ‘आयमा’ पदाधिकाऱ्यांची चर्चा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी अंबड औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पांना भेट दिली. सीईटीपी प्रकल्पांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्याचे निर्देश देत त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रोप्लेटिंग कंपन्यांचे सांडपाणी एकत्रित जमा करून त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी मलनिस्सारण केंद्र (सीईटीपी) प्लांट उभारण्यात येत आहे. प्रकल्प ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या उद्योजकांना त्यांचे सांडपाणी वैयक्तिक ‘ईटीपी’द्वारे प्रक्रिया करावे लागत असल्याची तक्रार मांडली. ‘आयमा’ अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. हे काम त्वरित पूर्ण करून प्लांट तातडीने कार्यान्वित करावा आणि जोपर्यंत प्लांट सुरू होत नाही, तोपर्यंत सांडपाण्याच्या विल्हेवाटीची संपूर्ण जबाबदारी ‘एमआयडीसी’ने उचलावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अधिकाऱ्यांशी संवाद साधून सविस्तर माहिती जाणून घेतली व प्रकल्प त्वरित मार्गी लावण्याचे आदेश दिले. या वेळी महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, आयमा सरचिटणीस संजय महाजन, नगरसेवक प्रियंका दोंदे, किरण राजवाडे, शरद फडोळ, कार्यकारी अभियंता कल्पेश लाहिवाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com