एमपीएससी अध्यक्षांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

एमपीएससी अध्यक्षांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
Published on: 
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक परीक्षा वेळेत घेण्यासह रखडलेले निकाल जाहीर करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शुक्रवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या परीक्षांची प्रक्रिया पारदर्शक करावी, रखडलेले निकाल जाहीर करावेत आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना मागण्यांचे निवेदन दिले. एमपीएससी परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक वेळेत जाहीर करून परीक्षा नियोजित तारखांना घ्याव्यात, रखडलेले निकाल तातडीने घोषित करावेत आणि शासकीय विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत भरताना भरतीच्या जाहिरातींमधील पदसंख्या वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रांची सुविधा द्यावी. केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच जिल्हा पातळीवर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत शासकीय अभ्यासिका व ग्रंथालये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार जाधव, शहराध्यक्ष गौरव शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पवार, देवरे, बापूराव हिरे, अतुल निकुंभ, प्रतीक पवार यांच्यासह विद्यार्थी व पदाधिकारी सहभागी झाले होते. फोटो क्रमांक :- एच-31830

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Row Maharashtra Government Tells Court Three of Four Student Demands Accepted Resignation Recommendation Sent to Governor
Sharad Pawar latest statement on NCP merger and Maharashtra
MPSC State Service 2024
नगर ः एमपीएससी पेपरफुटीची सखोल चौकशी करा. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ः गैरप्रकारातून झालेल्या निवडी रद्द करण्याची मागणी
Marathi News Esakal
www.esakal.com