मतदार यादीतील त्रुटी दूर करा

मतदार यादीतील त्रुटी दूर करा
Published on: 
धुळे टुडे १ साठी... --- फोटो- NSK26H33358 धुळे : मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासह अनुषंगिक मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना देताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते. --- मतदार यादीतील त्रुटी दूर करा --- भाजप धुळे महानगर; पात्र मतदारांचा हक्क अबाधित ठेवा --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील नावे, पत्ते व इतर तपशिलांमधील त्रुटी दूर करून यादी अधिक अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करावी. तसेच, दुबार व संशयित नोंदींची सखोल पडताळणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी भाजप धुळे महानगर शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप एसआयआर प्रमुख रोहित चांदोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. प्रारूप मतदार यादीतील चुकीची नावे, पत्त्यांमधील विसंगती, दुबार नोंदी आणि संशयित नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करून दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पुनरीक्षण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता बाळगण्यावर भर देण्यात यावा, असे भाजपने म्हटले आहे. कारवाईची मागणी एसआयआर प्रक्रियेच्या कामात सहभागी असलेल्या भाजपच्या बीएलओ-२ प्रतिनिधींना काही ठिकाणी काम करण्यापासून रोखणारे किंवा विरोध दर्शविणारे दूरध्वनी आणि संदेश प्राप्त होत असल्याचे नमूद करत मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावे, यासाठी अशा प्रकारांची योग्य चौकशी करावी आणि प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. याप्रसंगी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, भाजप उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, मंडल अध्यक्ष पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, सोशल मीडिया प्रमुख ॲड. गोपाल चौधरी, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, मच्छीमार सेल अध्यक्ष हिरालाल मोरे, यांच्यासह बीएलओ- २ प्रतिनिधी हेमंत लोणारी, अमोल मराठे, विजु गवळी, रोहित कदमबांडे, प्रणव घोलप, सूरज पाटील, हितेश ठाकरे आदी उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com