पात्र मतदारांच्या समावेशाची दक्षता घ्यावी

पात्र मतदारांच्या समावेशाची दक्षता घ्यावी
Published on: 
पात्र मतदारांच्या समावेशाची दक्षता घ्यावी --- उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याची विभागास सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम (एसआयआर) राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कोणत्याही पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नयेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी नोंदणी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत आयोगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात मतदार यादीतील नो मॅपिंग किंवा ‘लॉजिकल डिसक्रेपन्सी’ असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थितीबाबत नोटीस बजावलेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही; पण आवश्यक कागदपत्रे संबंधित बीएलओंकडे सादर करता येतील. नोटीस प्राप्त मतदारांच्या बाबतीत मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. तार्किक विसंगती असलेल्या मतदारांकडून केवळ संबंधित विसंगतीशी निगडित कागदपत्रे घेत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. अपवादात्मक प्रकरणांमध्ये मतदारांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीस हजर राहता येणार आहे. तसेच, पुरावे उपलब्ध नसलेल्या किंवा प्राप्त कागदपत्रांच्या आधारे निर्णय न घेतलेल्या प्रकरणांत मतदारांना आवश्यक कागदपत्रांसाठी संधी दिली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. --- दोन दिवस विशेष शिबिर मतदार नोंदणीसाठी ता. १० व ११ ऑक्टोबरला मतदान केंद्रस्तरीय विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात नोटीसप्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः पीव्हीटीजी गटातील व्यक्ती, अनाथ घटकातील मतदार, तसेच अनुसूचित जमातीतील मतदारांसाठी मदत कक्ष व विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com