जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या गुरुभक्ती व तपश्चर्येचे प्रतीक देवभूमी जनशांती धाम

जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या गुरुभक्ती व तपश्चर्येचे प्रतीक देवभूमी जनशांती धाम
Published on: 
पान-२ अँकर फोटो : 14789 ओझर ः जनशांती धाममधील महिला जपानुष्ठान सोहळ्यात बोलताना ब्रह्माकुमारी पूनमदीदी. गुरुभक्ती, तपश्चर्येचे प्रतीक जनशांती धाम ब्रह्माकुमारी पूनमदीदी ः ओझरला महिला जपानुष्ठान सोहळा सकाळ वृत्तसेवा ओझरता ३ : जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केलेल्या गुरुभक्तीचे आणि तपश्चर्येचे प्रतीक जनशांती धाम ठरले आहे. या धामात आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि शांतीची प्रचीती येते. महिला सक्षमीकरणासाठी मौनव्रतात आयोजित धर्म सोहळाही कौतुकास्पद असल्याचे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सांगितले. जनार्दन स्वामी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसा माता आणि स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ओम जगदगुरू जनशांती धर्म सोहळा होत आहे. हा सोहळा महिला साधिकांसाठी दर वर्षी होतो. या वेळी ब्रह्मकुमारी पूनमदीदी तसेच राजस्थानातील पिलीबंगा येथून आलेल्या ब्रह्माकुमारी राणीदीदी यांनी या सोहळ्याचे कौतुक करत महिला व भाविकांना मार्गदर्शन केले. पूनमदीदी यांनी परिसरात उभारण्यात आलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचा विशेष उल्लेख केला. शांतीगिरी महाराज यांच्या गुरुभक्तीचे आणि तपश्चर्येचे हे फलित असून, या पवित्र भूमीत प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि शांती अनुभवास येते. शांतीगिरी महाराज यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठीही मोठे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वशक्तिमान शिव परमात्म्याशी नाते दृढ केल्यास जीवन अधिक शांत, सुखी आणि समाधानी होऊ शकते. ईश्वरीय स्मरण, चिंतन आणि सकारात्मक विचारामुळे मनाला स्थैर्य प्राप्त होते, असेही पूनमदीदी यांनी सांगितले. यावेळी भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वय ब्रह्माकुमार राजन भाई यांनी केले. सोहळ्याला महिला व भाविक उपस्थित होते. .............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com