Crime News : गावठी कट्टा प्रकरणी दोघे जाळ्यात

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली
Crime  News
Crime Newssakal
Updated on

धुळे- दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. प्रणव किशोर शिंदे (वय २०, रा. विंचूर, ता. धुळे) व विनय देवानंद नेरकर (वय २३, रा. फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी, देवपूर, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com