Amravati Government Medical College Shift Row
esakal
अमरावती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय शहरापासून तब्बल १५ किलोमीटर अंतरावर सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने स्थानिक नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरत, शहरात जागा उपलब्ध असताना वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर नेण्याची गरज काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला.