

Nagpur's Dr. Babasaheb Ambedkar International Airport has recorded a 35.65% decline in international passenger traffic during January–September 2026.
esakal
नागपूर : आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर आखाती देशातील युद्धामुळे वारंवार होणारे खंड आणि उड्डाणांच्या वेळापत्रकातील अनिश्चिततेचा थेट फटका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत तब्बल ३५.६५ टक्क्यांची घट झाली आहे.