

Nagpur News
esakal
नागपूर: जनगणनेच्या कार्यासाठी नियुक्त अनेक प्रगणक आणि पर्यवेक्षक अद्याप रुजू झाले नाहीत, काही संस्थांकडून कर्मचाऱ्यांची माहिती लपवली जात आहे, अशा संस्थांविरुद्ध मनपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदेश झुगारणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.