Nagpur Police Seize 30 Illegal Pistols in Six Months
esakal
मंगेश गोमासे
नागपूर : शहरात अवैध शस्त्रांची घुसखोरी दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या सहा महिन्यांत शहर पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जवळपास ३० पिस्तूल आणि ६० हून अधिक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात पिस्तुलराज सुरू होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केवळ पिस्तूलच नव्हे तर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारी, चाकू यासारखी घातक शस्त्रे जप्त केली आहेत.