

Nagpur city police register 93 cases against public firecracker violations and unauthorized firecracker sales during Diwali.
sakal
नागपूर : दिवाळीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करून फटाक्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागपूर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध ३९, तर अनधिकृत फटाके विक्री प्रकरणी ५४ असे एकूण ९३ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एक लाख ९० हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.