नागपूर : प्रयागराज येथील गंगा, यमुना, और सरस्वती नदींच्या त्रिवेणी संगम स्नानाची अनुभूती शनिवारी नागपूरकरांनी घेतली, निमित्त होते, रेशीमबाग मैदानात आयोजित ''महाकुंभ प्रयाग योग'' सोहळ्याचे..आजवर कोट्यावधी भाविकांनी महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाचा केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या दर्शन व्हावे या अनुषंगाने तेथील हजारो लिटर पवित्र तीर्थजल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले आहे..व्हॅल्युएबल ग्रुपच्यातर्फे सतसंग फाउंडेशनच्या सहयोगाने आयोजित ''महाकुंभप्रयाग योग'' कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पवित्र संगम जलाचा शेकडो भाविकांवर वर्षाव करण्यात आला. याकरिता प्रवेशद्वारावर विशेष ''गंगा स्नान'' दालन तयार करण्यात आले..ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीर्थजलाचा वर्षाव करण्यात आला. तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात ''श्री गुरू पादुकांचे'' आगमन झाले. जलकुंभ व श्रींच्या पादुकांची रथयात्रा श्री गजानन चौकापासून रेशीमबाग मैदानापर्यंत निघाली..पारंपारिक वस्त्र परिधान करून शेकडो भाविक रथयात्रेत सहभागी झाले. हाती टाळ आणि मुखी श्रींच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. रथयात्रेच्या मार्गावर फुगड्या घालत भाविकांनी ''श्री गुरू पादुकांच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. विधिवत पूजा करून श्री गजानन महाराजांच्या मुंडगाव येथील प्रासादिक पादुका, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या धर्मपादुका, शिर्डी येथील श्री साईबाबांच्या प्रासादिक पादुका व सटका, सज्जनगढ येथील श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या प्रासादिक पादुका, श्री श्रीधरस्वमी महाराज, श्री महेश्वरनाथ बाबाजी महाराज, श्रीपंत महाराज यांच्या पादुकांना विशेष दालनात विराजमान करण्यात आले..दिवसभर भक्ती संगीत, सत्संग, कीर्तन, भजन, प्रवचनाच्या कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले. शेकडोच्या संख्येत भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू पद्मभूषण श्रीएम यांच्या आशीर्वचनांचा आभासी पद्धतीने लाभ घेतला..आज ‘महाकुंभ प्रयाग योग’ मध्येउद्या रविवारी (ता.१६) सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती. सायंकाळी पाच वाजता पद्मभूषण श्रीएम यांचा व्हर्च्युअल सत्संगसायंकाळी ६.३० वाजता महाआरतीने महाकुंभ प्रयाग योगचा समारोपसांस्कृतिक मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केला जलाभिषेक.‘महाकुंभ प्रयागयोग’ या प्रयाग स्नानाची औपचारिक दिव्य अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सपत्नीक दर्शन घेतले. पत्नी ॲड. प्रतिमा शेलार सोबत त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि संगम जल अभिषेक सोहळ्यानिमित्त जल अभिषेक केला. यावेळी व्हॅल्यूएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे यांनी ॲड. आशीष शेलार यांना पवित्र कलश प्रदान केला. याप्रसंगी नरेंद्र हेटे, मंजिरी हेटे, अंकित हेटे, सत्संग फाउंडेशनचे शुक्रे यांची प्रमुख उपस्थिती होती..Mahatma Phule Scheme : पावणेदोन वर्षाच्या बाळाने दिला आवाजाला ‘ओ’ ; एम्समध्ये महात्मा फुले योजनेतून पहिलेच कॉक्लिअर इम्प्लांट.कैलाश खेर यांच्या गायकीने वातावरण राममयरेशीमबाग मैदानात आयोजित ‘महाकुंभ प्रयागयोग’ सोहळ्यात सुप्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी श्रीराम भक्तीची गीते सादर करून वातावरण राममय केले. कैलाश खेर यांनी श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. जय श्री राम ही राम धून सादर करीत अजी मैं तो भजू राम ही राम, जय जय कारा, शिव चले, चंचल मन, भोले चले भोले चले आदी भगवान शिवाची गाणी सादर करून मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांची मने जिंकली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.