Vidarbha Cold Wave
esakal
नागपूर : दिवाळी संपताच नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत गारवा जाणवत असून, रात्रीच्या तापमानातही मोठी घट झाली आहे. रविवारी काही ठिकाणी किमान तापमानात पाच अंशांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. यवतमाळमध्ये विदर्भातील सर्वात कमी म्हणजेच १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आता सकाळी आणि रात्री नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे.