

Tribal Beneficiaries Suffer as PM Housing Scheme Payments Remain Pending in Akole
sakal
अकोले : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मुरशेत व वारंघुशी गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाचे पुढील हप्ते न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घराचे बांधकाम अर्धवट राहिल्याने अनेक कुटुंबांना भर पावसात जुन्या पत्र्यांचा व प्लास्टिकच्या कागदांचा आधार घेत राहावे लागत आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे गरीब लाभार्थ्यांवर ही वेळ आल्याचा आरोप समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी केला आहे.