सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक, दरात झाली वाढ काय आहे आजचा भाव?

आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे.
Check Today's Gold Price Updates
Check Today's Gold Price Updatesesakal

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी्च्या दरात चढ उतार दिसून येत आहे. महिन्याच्या सुरवातीच्या दोन दिवसात सोने चांदीत घसरण होत असताना आज या घसरणीला ब्रेक लागलाय. आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी घसरण झाली असून 10 ग्रॅम चांदीचा दर आज 614 रूपये आहे. (Today's Gold, Silver Price Updates)

गुरुवारला सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47500 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,820 रुपये होती तर चांदीच्या दरातही थोडी घसरण होत 10 ग्रॅम चांदीचा दर 606 रूपये होता. (gold silver rate todays update 3 june 2022)

Check Today's Gold Price Updates
Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 425, तर निफ्टी 130 अंकांनी वधारला

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,100 रुपये

दिल्ली - 51,930 रुपये

हैदराबाद - 51,930 रुपये

कोलकत्ता - 51,930 रुपये

लखनऊ - 52.100 रुपये

मुंबई - 51,930 रुपये

नागपूर - 52,030 रुपये

पूणे - 52,030 रुपये

Check Today's Gold Price Updates
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरांतील भाव

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Check Today's Gold Price Updates
LPG गॅस सिलिंडरवर 'सबसिडी' मिळवणाऱ्यांना झटका; 'या' खात्यांनाच मिळणार 200 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com