पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत अर्धा तास दिलखुलास गप्पा; १९९१ची पुणे विमानतळावरील अविस्मरणीय पत्रकार भेट

१९९१ मध्ये पुणे विमानतळावरील छोट्याशा केबिनमध्ये पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याशी अर्धा तास दिलखुलास गप्पा; सरकारी अधिकारी, सुरक्षा नसलेला अनौपचारिक संवाद आज अविश्वसनीय वाटणारा अनुभव
The Era of Simplicity: When Prime Minister V.P. Singh Met Journalists Without Security

The Era of Simplicity: When Prime Minister V.P. Singh Met Journalists Without Security

Sakal

Updated on

`हं, बोला, विचारा तुमच्या मनातील प्रश्न..'

असं साक्षात भारताच्या पंतप्रधानांनी आम्हा पत्रकारांना म्हटलं आणि त्यानंतर आम्ही पत्रकार त्यांच्याबरोबर पाचदहा मिनिटे नव्हे तर चक्क अर्धा तास गप्पा मारत बसलो होतो.

साल होते १९९१. पंतप्रधान होते विश्वनाथ प्रताप सिंग आणि त्याच्या शेजारी बसलेल्या होत्या जनता दलाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे आणि समोर फक्त आम्ही दोन पत्रकार होतो.

इंडिया एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा मी बातमीदार कामिल पारखे आणि टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या पुणे प्लसचे बातमीदार मुकुंद संगोराम.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com