

Central America on Foot A Long Walking Journey Through Diverse Landscapes Cultures and Challenging Routes
esakal
ब्रिटनचे लेव्हिसन वुड हे पायी जगभ्रमण करणारे अफलातून व्यक्तिमत्व होय. त्यांनी लिहिलेलं ‘वॉकिंग द अमेरिकाज – १८०० माईल्स, एट कन्ट्रीज अँड वन इनक्रेडिबल जर्नी फ्रॉम मेक्सिको टू कोलंबिया’ हे क्षणाक्षणाला थरार निर्माण करणारं प्रवास वर्णन नुकतच वाचलं. मेक्सिको ते कोलंबिया या दरम्यानच्या आठ देशांच्या १८०० मैल (२८९७ कि.मी.) प्रवासाला त्यांना तब्बल चार महिने लागले.
हे देश होत, मेक्सिको, बेलिझे, ग्वाटेमाला, होन्डूरास, निकारागुआ, कोस्टा रिका, पनामा व कोलंबिया.