'तुम्ही 25 विचारले, आम्ही पाचच विचारु'; IMA चं रामदेव यांना ओपन चॅलेंज

baba ramdev
baba ramdev
Summary

आयएमए उत्तराखंड आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्यात सुरु झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. बाबा रामदेव यांनी विचारलेल्या प्रश्वांना उत्तर देण्यासाठी आयएमए एक कमेटी स्थापन करणार आहे.

नवी दिल्ली- आयएमए उत्तराखंड आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्यात सुरु झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. बाबा रामदेव यांनी विचारलेल्या प्रश्वांना उत्तर देण्यासाठी आयएमए एक कमेटी स्थापन करणार आहे. ही कमिटी बाबा रामदेव यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याबरोबरच त्यांनाच उलट पाच प्रश्न विचारणार आहे. आयएमएचे प्रदेश महासचिव डॉ. अजय खन्ना यांनी म्हटलंय की, बाबा रामदेव यांनी पत्र लिहून अॅलोपॅथी डॉक्टरांना 25 प्रश्वांचं उत्तर देण्यास सांगितलं होतं. यावर आम्ही उत्तर देणार आहोत. आयएमए पाच सदस्यीय कमेटीची स्थापना करणार आहे. यातून बाबा रामदेव यांच्या प्रश्वांची उत्तरं देण्यात येतील, पण त्यांना पाच प्रश्व विचारण्यात येतील. बाबा रामदेव यासाठी तयार आहेत का? अट एकच असेल त्यांनी माध्यमांसमोर चर्चेसाठी तयार व्हावं. (baba ramdev patanjali ima IMA Uttarakhand allopathy doctors)

बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांची योग्यता काय?

आयएमए उत्तराखंडकडून बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना ईमेल करुन त्यांचं क्वालिफिकेशन विचारण्यात आलं आहे. आयएमएच्या सचिवांनी सांगितलं की, बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीसंबंधी प्रश्न विचारले आहेत. यासाठी आयएमए लवकरच पाच सदस्यीय कमिटी बनवणार आहे. याआधी त्यांनी बाबा रामदेव आणि त्यांचे सहयोगी बालकृष्ण यांची योग्यता विचारली आहे. त्यांनी सांगितलं की याप्रकरणी आयएमएने बाबा रामदेव यांना ईमेल केला आहे.

baba ramdev
मृतांचे आकडे लपवून मोदींचा PR स्टंट; राहुल गांधींच्या टीकेवर भाजपही आक्रमक

आयएमए उत्तराखंडने रामदेव बाबांवर एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. रामदेव बाबांना अॅलोपॅथीचा ए देखील माहित नाही. त्यांनी विचारलेल्या २५ प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही तयार आहोत, त्याआधी त्यांनी स्वत:ची योग्यता सिद्ध करावी. तसेच केंद्र सरकार महामारी कायद्यानुसार जर रामदेव बाबांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आयएमएनं दिला आहे.

baba ramdev
ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) थेट कायदेशीर कारवाईचा इशारा मिळाल्यानंतर देखील रामदेवबाबांची वादग्रस्त विधाने मात्र काही केल्या थांबलेली नाहीत. रामदेव यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून त्यात त्यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान केले आहे. ‘‘त्यांचा बाप देखील मला अटक करू शकत नाही.’’ असे विधान रामदेवबाबा करताना दिसत आहेत.‘‘ ही मंडळी फक्त खळखळ करत असून त्यांना फक्त ठग रामदेव, महाठग रामदेव आणि गिरफ्तार रामदेव अशा प्रकारचे ट्रेंड तयार करता येतात.’’ असे मत त्यांनी यात मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com