esakal | ESakal Survey : मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती कशी हाताळली?
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI

केंद्रातील भाजप सरकारची सात वर्षे पूर्ण होत आहेत. पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा भाजपने एकहाती निवडणूक जिंकली. पण मोदी सरकारला दुसऱ्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला

ESakal Survey : मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती कशी हाताळली?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

केंद्रातील भाजप सरकारची सात वर्षे पूर्ण होत आहेत. पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा भाजपने एकहाती निवडणूक जिंकली. पण मोदी सरकारला दुसऱ्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आत्तापर्यंतच्या दोन्ही कार्यकाळातील एकूण सात वर्षांमध्ये सरकारनं कसं काम केलंय आणि लोकांना या सरकारबद्दल नक्की काय वाटतंय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न या डिजिटल सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला अगदी एका क्लीकवरच द्यायची आहेत. फक्त होय किंवा नाही या पर्यायांत तुम्हाला 29 मे 2021 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मत नोंदवता येईल. सर्व्हे ओपन करण्यासाठी क्लिक करा

2014 च्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा करत नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवली. त्यानंतर 2020 मध्ये मोदींनी आत्मनिर्भर भारत अशी घोषा केली. मोदींनी आतापर्यंत घेतलेले काही निर्णय हे वादग्रस्त ठरले तर काही निर्णयाचे विरोधकांनीही स्वागत केले.

मोदींनी पंतप्रधान म्हणून सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर दुसऱ्या कार्यकाळातील हे दुसरं वर्ष महत्त्वाचं असं आहे. सहा महिन्यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभेत उत्तर प्रदेशातील निकाल महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे याकडे सर्व लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभराचा काळ मोदी सरकारसाठी खूप कठीण असा काळ ठरला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यामध्ये सरकारच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच गेल्या आठवड्यात दोन सर्व्हेमध्ये मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या सहा वर्षातील मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा आता भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.