"'द काश्मीर फाईल्स' चित्रपट करमुक्त करण्याऐवजी YouTube वर टाकावा"

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत भाजपवर निशाणा साधला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal सकाळ डिजिटल टीम

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत भाजपवर निशाणा साधला. द काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यू ट्यूबवर टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.

Arvind Kejriwal
बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूत सामूहिक बलात्कार

काश्मिरी पंडितांवर आधारित 'द काश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अनेक भाजपशासित राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी केली जात आहे

अशातच विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' दिल्लीत करमुक्त करण्याच्या मागणीला केजरीवाल दिल्ली विधानसभेत उत्तर देताना म्हणाले, , "काही लोक काश्मिरी पंडितांच्या नावावर करोडो रुपये कमवत आहेत आणि तुम्हाला (भाजप) पोस्टर लावण्याचे काम दिले आहे. सोबतच द कश्मिर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यूट्यूबवर अपलोड करण्यास सांगावे. कारण तिथे प्रत्येकजण तो चित्रपट फ्री पाहू शकतील”

Arvind Kejriwal
RSS : 'एक दिवस सर्व मुस्लिम-ख्रिश्चन RSS मध्ये सामील होतील'

1990 च्या दशकात काश्मिरी पंडितावर झालेले अत्याचार, त्यांना दिलेला त्रास किंवा काही पंडित काश्मीर सोडून गेले तर काहींची हत्या झाली याविषयी बरंच बोलले जाते तर आतापर्यंत या मागे झाकून ठेवलेले सत्य या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मुळात या चित्रपटावरुन देशभरात राजकारण सुरु असल्याने या चित्रपट आणखी चर्चेत येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com