Dhruv Rathee Bengaluru protest against SIR process
esakal
बंगळूर : एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे गुरुवारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी, अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज तसेच ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.