रामबन पोलिसांनी गुल परिसरातील मालमत्ता UAPA अंतर्गत जप्त केल्या..वित्त आणि महसूल सचिव तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे..उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. .तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. .आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना वाघोली पोलिसांनी तर एकाला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. चौघांकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचा ४.७७१ किलो गांजा व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली..मुख्यमंत्री अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेच उदघाटन सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र नगरच्या मैदानावर नागपूर महानगर पालिका आणि लक्ष्यवेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. .मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन साठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने आता एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे..स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणातील आरोपीला घेऊन पोलीस कोर्टाकडं रवाना झाले आहेत. आज मध्यरात्री आरोपीला पोलिसांनी त्याच्या शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातून अटक केली. तत्पूर्वी पोलिसांनी श्वानपथकासह तो ऊसात लपल्याची खबर मिळाल्यानं त्याचा सर्वत्र शोध घेतला. .ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह इथं संत रविदास महाराज यांची ६४८वी जयंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी. चर्मकार समाजातून येऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं..रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी येत्या काळात हवाई वाहतूक सुरू करणे आवश्यक आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर पॉडटॅक्सीचा प्रकल्प ओवळा माजिवडा मतदारसंघात राबवण्यात येणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.- महाराष्ट्र राज्य बॅंकेने कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शारदा सहकारी सुतगिरणी जप्त करुन सिल लावले होते. - ते सिल तोडून चोरट्याने शटर उघडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्याने सुतगिरणीतील ॲल्युमिनियमचे पोकळ पाईप, बिड लोखंड, लोखंडी शॉप्ट, लोखंडी मशीन असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. - या प्रकरणी संजय श्रीधर पाटील (रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांनी वळसंग पोलिसांत दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत..- आरोपीला कोर्टात हजर करण्याच्या हालचाली सुरु - आरोपीला कोर्टात घेऊन जाण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात- शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आरोपीला हजर करणार- थोड्या वेळात पोलीस लष्कर पोलीस ठाण्यातुन आरोपीला घेऊन निघणार.महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे..नागपूर महामार्गावर जमीन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भुसंपादनास विरोध करणा-या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतक-यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस ठाण्यात शेतक-यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले. .प्रसिद्ध अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन ग्रीन यांनी आयआयटी दिल्लीच्या भेटीदरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला तसेच संस्थेच्या संशोधन आणि नवोन्मेष पार्कचा दौरा केला. .- आरोपीला आज आम्ही प्रत्यक्ष हजर करतो. फक्त उशिरा कोर्टा समोर हजर करण्याची परवानगी द्यावी - संध्याकाळी ६ वाजेपंर्यत आरोपीला कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी द्यावी. पोलीसांची कोर्टाला विनंती. - पुढील सुनावणीसाठी ॲानलाईन/ व्हीसी द्वारे आरोपीला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. पुणे पोलीसांची कोर्टाला विनंती.गुनाट गावातील ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी त्यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रयला पकडून दिल्याचा दावा केला आहे. .संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड कोर्टात चालवण्याची विनंती एसआयटीने कोर्टाकडे केली आहे. बीड कोर्टात खटला चालवण्यासाठी हाय कोर्टची परवानगी घ्या. खटला केज कोर्टमध्येच चालवला जाणार असं न्यायाधीशांनी सांगितलं. . राजकीय टोलेबाजीने सभा गाजविणारे मनसे पक्ष प्रमुख आता क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत. डोंबिवली जवळील हेदुटणे गावात स्व. रतन बुवा स्मृती चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला यंदा प्रथमच राज ठाकरे हे उपस्थिती लावणार आहेत..अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथमध्ये ग्लेशियर कोसळला. यामध्ये 57 जण अडकले आहेत. तर शासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..कोर्टासमोर आता सुनावणी संपली. विशीद्वारे आरोपी हजर केला जाणार की प्रत्यक्ष याबाबत निर्णय बाकी . श्रीमती टी एस गायगोले कोर्टाचा निर्णय अजून बाकी.स्वारगेट एस टी स्टँड बलात्कार प्रकरणी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात येण्याच्या संदर्भात ही चर्चाकायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठला ही गोंधळ उडू नये, यासाठी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे न्यायालयाच्या समोर नेण्याच्या बाबत प्राथमिक चर्चाआरोपी दत्ता गाडे याच्यावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी आहेपुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष.येणारं दशक हे अंतराळ विज्ञानाचं दशक असेल आणि भारत त्यावर आपला ठसा उमटवेल..रायगड जिल्ह्यातील अक्षी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापासून 6-7 नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला आज पहाटे 3 ते 4 च्या सुमारास आग लागली. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या तत्पर कारवाईमुळे बोटीवरील सर्व 18 खलाशांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले, अशी माहिती रायगड पोलिस अधिक्षकांनी दिली..- मुंबईतील भायखळा पूर्व, बी.ए. रोडवरील न्यू ग्रेड इंस्टा मिलजवळील साल्सेट बिल्डिंगमध्ये आज लेव्हल-१ स्तराची आग लागली. - सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. - अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. - अधिक माहीती अद्याप मिळालेली नाही..-भोकरदन तालुक्यात जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉड चुलीत तापवून अंगाला अनेक ठिकाणी चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पारध पोलिसांनी गुरुवारी (ता. 27)रात्री उशिरा दोघांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे..आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रणआढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल.काल रात्री स्वारगेट प्रकरणातील आरोपीला काल ताब्यात घेण्यात आले आहेगुन्हे शाखेचे पथक, स्वारगेट पोलिसांचे पथक यासह ५०० पोलिस अधिकारी कर्मचारी गेल्या ३ दिवसांपासून गुणाट गावात होते४०० ते ५०० ग्रामस्थांच्या वतीने चांगला पाठिंबा मिळालाश्वान पथकाने सुद्धा उत्तम कामगिरी केली, drone ने आरोपीचा मागा कळला१.१० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे, अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहेआज न्यायालयात आरोपीला हजर केले जाईलतपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहेविशेष कौन्सिलर ची नियुक्ती करण्यात आली आहे.कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखाना परिसरात आग घटनास्थळी पाच ते सहा अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल छ. राजाराम कारखान्याचे चेअरमन व आमदार अमल महाडिक हे देखील घटनास्थळी दाखलशॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची आमदार अमल महाडिक यांची माहिती कारखान्यातील बॉयलरला लागली आगराजकीय दृष्ट्या राजाराम कारखान्याला कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्व आहे आपणास स्थळी अग्निशामन दलाचे जवान आणि पोलीस दाखल.प्राध्यापक गणेश गव्हाणे यांनी आरोपीला प्रथम पकडला असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. प्राध्यापक गव्हाणे यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली होती व पकडण्यासाठी मदत केली असं ग्रामस्थांनी गव्हाणे यांचे म्हणणे आहे. .पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एक 35 वर्षीय तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारुन जीवन संंपविले आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. .पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला मध्यारात्री शिरुरमधील गुनाट गावातून अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.