भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!
भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!
भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!esakal
Summary

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.

सोलापूर : भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची (Government Jobs) संधी चालून आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research - ICAR) भारतीय कृषी संशोधन संस्थेने (Indian Agricultural Research Institute - IARI) परिषद आणि त्यांच्या विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (Government jobs for tenth pass in Indian Agricultural Research Institute)

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!
ONGC मध्ये PRO अन्‌ HR एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती

संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार तंत्रज्ञांच्या (Technician) एकूण 641 पदांची भरती करायची आहे. यापैकी 286 पदे अनारक्षित आहेत, तर 133 पदे ओबीसी, 61 EWS, 93 SC आणि 68 ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. तथापि, IARI च्या जाहिरातीनुसार पदांची संख्या प्रस्तावित आहे आणि ती वाढू किंवा कमी होऊ शकते.

असा करा अर्ज

ICAR तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार nbri.res.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार, 18 डिसेंबर 2021 पासून सुरू होईल आणि उमेदवार 10 जानेवारी 2022 पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना IARI ने निर्धारित केल्यानुसार 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, जे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून भरू शकतात.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या!
डॉलर बिघडवेल तुमचा बजेट! फेडच्या 'या' निर्णयामुळे रुपयाला जाईल तडा

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

ICAR-IARI ने जारी केलेल्या तंत्रज्ञ भरती जाहिरातीनुसार, या पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक (दहावी) परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता आहे. तसेच उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे. अधिक तपशिलासाठी आणि भरतीसंबंधी इतर तपशिलांसाठी IARI द्वारे अधिकृत वेबसाइटवर अर्ज सुरू होण्यासोबतच जारी करण्यात येणारी भरती अधिसूचना पाहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com