ONGC मध्ये PRO अन्‌ HR एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती

ONGC मध्ये जनसंपर्क अधिकारी अन्‌ HR एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती
ONGC
ONGCesakal
Summary

पब्लिक रिलेशन किंवा एचआर पदाची सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे.

सोलापूर : पब्लिक रिलेशन किंवा एचआर पदाची सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे. भारत सरकारच्या (Government of India) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (Ministry of Petroleum and Natural Gas) अंतर्गत देशातील मोठी कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने (Oil and Natural Gas Limited - ONGC) जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) आणि एचआर एक्‍झिक्‍युटिव्ह (HR Executive) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (Recruitment of Public Relations Officer and HR Executive in ONGC)

ONGC
भारतीय तटरक्षक दलात जीडी अन्‌ मेकॅनिकल पदांची भरती!

कंपनीने 15 डिसेंबर 2021 रोजी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, HR एक्‍झिक्‍युटिव्हच्या 15 पदांसाठी आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) च्या 6 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की ओएनजीसीमध्ये PRO आणि HR भरती UGC NET जून 2020 च्या स्कोअरच्या आधारे करायच्या आहेत.

कोण करू शकतो अर्ज?

ONGC भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित विषयात विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission - UGC) द्वारे आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test - NET) : जून 2020 उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, एचआर एक्‍झिक्‍युटिव्हच्या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह एचआर संबंधित विषयात एमबीए केलेले असावे. त्याचवेळी, पीआरओ पदासाठी उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह पत्रकारिता आणि जनसंवादात पीजी पदवी उत्तीर्ण असावा.

ONGC
ESIC करतेय 1120 ग्रेड 2 पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर दिलेल्या लिंकवरून अर्ज पेजला भेट देऊ शकतात. बुधवार, 15 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 4 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना 300 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ते ऑनलाइन माध्यमातून भरू शकतील. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा, कारण मुदतीनंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com