कर्करोगापासून बचाव करायचाय! 'हे' तीन पदार्थ खा

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस कर्करोग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो
 Cancer food
Cancer foodesakal

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस कर्करोग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या आजाराचा धोका कमी करणे हा या दिवस साजरा (World Cancer Day) करण्यामागे उद्देश आहे. कर्करोग (Cancer) विविध प्रकारचे असतात. ते समजून घेतले तर त्यापासून संरक्षण करता येऊ शकते. पण तुम्ही दैनंदिन गरजांमध्ये, लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) बदल करून कर्करोगापासून वाचू शकता. त्यामळे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी काय खावे-काय खाऊ (Food) नये ते समजून घेणे गरजेचे आहे.

 Cancer food
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी CDC च्या सल्ल्यानुसार घ्या काळजी
फळं (Fruits)
फळं (Fruits)esakal

कोणते पदार्थ खा (What To Eat To Prevent Cancer)

१) फळं - फळे खाऊन कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. फळांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. व्हिटॅमिन सी आणि मौसमी फळे खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो.

 Cancer food
पुरूषांमध्ये ब्रेकअप्स, एकटेपणामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अभ्यासात स्पष्ट
ग्रीन टी
ग्रीन टीEsakal

२) टोमॅटो- टोमॅटो घरात सहज उपलब्ध असतात. त्यात लायकोपीन आढळते. तसेच त्यात अॅंटीऑक्सिडंट गुणधर्मही आढळतात. यामुळे कर्करोगापासून लढण्यासाठी मदत मिळते.

३) ग्रीन टी - ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या चहात EGCG नावाचे अँटीऑक्सिडंट असते. जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.

 Cancer food
डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट
Cigarate
Cigarate

या पदार्थांपासून राहा दूर ( What Not To Consume To Prevent Cancer)

१) सिगरेट- कर्करोगापासून वाचण्यासाठी सिगरेट सोडणे गरजेचे आहे. सिगरेट जास्त ओढत असल्यास आरोग्यावर परीणाम तर होतोच तसेच, कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

 Cancer food
पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? कसे ओळखाल, जाणून घ्या लक्षणे
drinking
drinkingesakal

२) तळलेले पदार्थ- सगळ्यांनाच तळलेले पदार्थ अतिशय आवडतात. जास्त तेलकट पदार्थ खाणे हानिकारक मानले जाते. कर्करोगाच्या रूग्णांनी तळलेल्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.

दारू- आजकाल दारू पिणे फॅशन बनली आहे. प्रत्येक वयोगटातले लोकं दारू पिताना दृष्टीस येतात. पण जास्त दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक असते. कर्करोग असलेल्या रूग्णांनी दारू पिणे टाळले पाहिजे.

 Cancer food
कॅन्सरपासून वाचण्यासाठी काय करायला हवं ? जाणून घेऊया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com