कृषी विभागाने बोगस कापूस बियाणे केले जप्त

जप्त केलेल्या बोगस बियाण्याच्या पाकीटांसह कृषी विभागाने अधिकारी
जप्त केलेल्या बोगस बियाण्याच्या पाकीटांसह कृषी विभागाने अधिकारीesakal
Updated on

जळगाव : शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्रीसाठी आणून शिरसोली प्र.बो. (ता.जळगाव) येथे साठा केलेली ७५ कापूस बियाणे पाकिटे कृषी विभागाने जप्त केली. अनधिकृतपणे कापूस बियाणे विक्री करणाऱ्या मे.इंद्रा सिड्स (अहमदाबाद) यांचे शिरसोली प्र.बो. येथील गोदामावर आज छापा टाकून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या बोगस बियाण्याच्या पाकीटांसह कृषी विभागाने अधिकारी
जिल्ह्यात 93 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 64 कोटी जमा

जिल्हा अधीक्षक (कृषी)संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषी सहाय्यक कमलेश पाटील, भरत पाटील यांच्या सहकार्यांनी सापळा रचून एकूण ९२ हजार ७५० किमतीची ७५ एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे जप्त केली. मे.इंद्रा सिड्स कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप बैरागी (रा.पाचोरा), कंपनीचे मालक इंद्रदन संकाभाई पटेल, (रा.अहमदाबाद) यांचे विरुद्ध बियाणे नियम १९६८ व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार जळगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विना बिलाचे बियाणे खरेदी करू नका

खरीप हंगाम २०२२ मध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विना बिलाने खरेदी करू नये. या बियाण्यांची कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी लागवड करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास ८४६८९०९६४१, ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जप्त केलेल्या बोगस बियाण्याच्या पाकीटांसह कृषी विभागाने अधिकारी
जळगाव जिल्ह्यातील 144 गावांना केळीची भरपाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Tukaram Mundhe?
Crime
Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Marathi News Esakal
www.esakal.com