

Husband Files Complaint After Wife Elopes With Lover
Esakal
जामनेर, ता. ८: आपल्या सख्ख्या मुलीचा साखरपुडा अवघ्या तीन दिवसांवर असताना, त्याची कोणतीही तमा न बाळगता आईने स्वतःचेच लग्न एका अविवाहित प्रियकर तरुणाशी गेल्या शनिवारी (ता. ६) उरकून घेतले. शहरातील या धक्कादायक प्रकाराने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. दरम्यान, प्रियकराने मोबाईलवर लग्नाचे 'स्टेटस' ठेवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.